Past Events

शांतेचं कार्ट चालू आहे!
सिनसिनाटीच्या नाट्यरसिकांनो…. तुम्हाला ठाऊक आहे? मराठीत गाजलेल्या “ऑल द बेस्ट”, किंवा “वस्त्रहरण” यासारख्या विक्रमी नाटकांच्याही पूर्वी एका नाटकाने इतिहास घडवला होता…. नयनतारा, सुधीरभाऊ जोशी, आणि आपल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला लक्ष्या बेर्डे; या तिघांनी अजरामर करून ठेवलेलं हे नाटक म्हणजे “शांतेचं कार्ट चालू आहे”. प्रथितयश नाटककार श्रीनिवास भणगे यांनी त्याकाळी गाजलेल्या तेंडुलकरांच्या नाटकाच्या नावावरून गंमत करत हा फार्स घडवला. लक्ष्या बेर्डे आणि कलाकारांनी या संहितेचं एक शिवधनुष्य बनवून ठेवलंय. आमच्या कलासन्मानच्या कलाकारांना श्रीनिवास भणगे काका नवीन नाहीत. त्यांचं “कॉटेज नं. ५४” हे नाटक करोनाच्या महामारीच्या काळात कलासन्मानने यशस्वीरीत्या OTT वर सादर करून जगातल्या तीन खंडांमध्ये प्रेक्षक मिळवले होते. आता कलासन्मान येत आहे तुमच्या भेटीला…..आपला गुढीपाडवा साजरा करायला……
“रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांस वंदन करून, त्रिवेणी मित्र मंडळ सहर्ष सादर करीत आहे, कलासन्मान निर्मित, श्रीनिवास भणगे लिखित…. पराग कानविॅदे दिग्दर्शित….. तीन अंकी धमाल विनोदी फार्स…..शांतेचं कार्ट चालू आहे!!!

नाद हा माझा
आपणां सर्वांनाच कसला ना कसला तरी नाद असतो…. पण काहींची ती व्याधी बनून जाते… एक Obsessive Compulsive Disorder (OCD)! आमच्या या सहा शिलेदारांना असाच कसला ना कसला नाद आहे. त्यांचं जिणं त्या नादापायी मुश्किल होऊन बसलंय. आणि ते आलेत डॉ. धुरंधर या प्रख्यात मानसतज्ञाकडे… इलाजासाठी. पण डॉ. तर विमानतळावर अडकलेयत…. आणि सहाही जणांच्या अपॉईटमेंट्स एकदमच झाल्यात ….. तीन वाजतां …! हे काय गौडबंगाल आहे? आणि यातून मार्ग कसा काढायचा? लरॉन्त बाफी यांच्या मूळ फ्रेंच कथेवरचं हे मराठी रूपांतर…… “नाद हा माझा”!!! खरंच, या नाटकाचे जागतिक शुभारंभाचे (World Premiers) प्रयोग सिनसिनाटीत होणार आहेत, कलासन्मान तर्फे…! शुभारंभाच्या प्रयोगातले सहा शिलेदार आहेत…. अभिजित भावसार, शिल्पा लोणी, वृंदा लेले, श्रुती भावसार, राज लोणी, आणि पराग कानविंदे…. आणि त्यांच्या अपॉईटमेंट्स एकदमच करून हा गोंधळ घडवून आणलाय मनीषा जोशी या डॉक्टरांच्या रिसेप्शनिस्टने….. बघूया काय गोंधळ होतोय तो रंगमंचावर…… येत्या मार्च महिन्यात …..शुभारंभाचे प्रयोग…!










